भाजयुमोचा सिल्लोड तालुका उपाध्यक्ष संदीप बावस्कर शिवसेनेत दाखल

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड मतदार संघातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

आज तालुक्यातील लिहा खेडी येथील सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अंबादास सपकाळ यांच्यासह भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बावस्कर, विलास बावस्कर, आत्माराम फरकाडे, जगन गायकवाड, देविदास सपकाळ, गजानन गोराडे, रामदास सपकाळ यांनी देखील आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी उपसरपंच रुपेश जैस्वाल तसेच पोपट साखळे, प्रकाश साखळे, कृष्णा फरकाडे, संतोष साखळे आदी उपस्थित होते. प्रवेश सोहळ्यादरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेना ही सर्वसामान्यांची बाजू घेणारा पक्ष असून स्थानिक विकास, जनतेचे प्रश्न आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना सातत्याने लढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भक्कम ताकदीने मैदानात उतरणार
असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत दोन दिवसांपूर्वी उंडणगाव येथील भाजपच्या माजी सरपंच कल्पना शेषराव सोनवणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर लिहा खेडी येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठे भगदाड पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात शिवसेना अधिक पावरफुल होतांना दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढलेला आहे. या राजकीय घडामोडींमुळे सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.